करमाळा:
हिवरे (ता. करमाळा) येथील सौ. देवईबाई शाहूराव फरतडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे फरतडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण करमाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौ. देवईबाई फरतडे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांच्या पत्नी होत. तसेच मराठा उद्योजक लाॅबीचे प्रदेशाध्यक्ष वैभव फरतडे आणि युवासेना तालुकाप्रमुख तथा दैनिक ‘सामना’चे पत्रकार शंभुराजे फरतडे यांच्या त्या मातोश्री होत.

कुटुंबाला एकत्र ठेवणारे आणि सर्वांना प्रेमाने सांभाळणारे एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपल्याने फरतडे कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांनी फरतडे कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
